BREAKING चिखलीत विजयी मिरवणुकीला गालबोट! भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर हल्ला; मॅटर पोलीस ठाण्यात....
Updated: Dec 21, 2025, 19:20 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख विजयी झाले आहेत. यासह भाजपचे एकूण १३ नगरसेवक निवडून आले आहेत..दरम्यान प्रभागात विजयी मिरवणूक सुरू असताना या मिरवणुकीला गालबोट लागले असून दोन गटांत धक्काबुक्की झाली.. भाजपचे विजयी नगरसेवक दत्ता सुसर यांच्या कुटुंबावर काहींनी हल्ला केला, दरम्यान काही काळ दोन्ही गटात वाद झाल्यानंतर आता हे मॅटर पोलीस ठाण्यात गेले आहे..
भाजपचे नगरसेवक दत्ता सुसर हे प्रभाग क्रमांक नऊ मधून विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या गोपाल गायकवाड यांचा त्यांनी पराभव केला. दत्ता सुसर हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. सतत लोकांमध्ये असलेला वावर, एका कॉलवर हजर यामुळे दत्ता सुसर यांचा विजय आधीपासूनच निश्चित मानला जात होता. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले..दरम्यान नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांची विजयी मिरवणूक पार पडल्यानंतर निवडून आलेले नगरसेवक आपापल्या प्रभागात मिरवणुकीसाठी गेले. प्रभाग क्रमांक ९ मध्ये दत्ता सुसर मतदारांचे आभार मानत असताना त्यांचे कुटुंबीय देखील सोबत होते. याच वेळी मोटर सायकल वर आलेल्या काही तरुणांनी हुज्जत घालत सुसर कुटुंबावर हल्ला चढवल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. काही वेळानंतर तिथे आणखी काही तरुण मोटर सायकल वर आल्याने दोन गटांत वाद वाढला..आता हे मॅटर पोलीस ठाण्यात पोहचले आहे.