BREAKING NEWS सहकारातला दबदबा कायम!जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल मतदाना आधीच लागला! डॉ. राजेंद्र शिंगणे अविरोध.....

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या मतदाना आधीच पहिला निकाल लागला आहे. माजी मंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे सिंदखेडराजा सोसायटी मतदारसंघातून अविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात राहेरी ता. सिंदखेडराजा येथील दत्ताराव देशमुख यांनी अर्ज भरला होता. दोघांचेही अर्ज वैध ठरवण्यात आले होते. मात्र अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी  दत्ताराव देशमुख यांनी माघार घेतल्याने डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा विजय निश्चित झाला आहे... सहकार क्षेत्रात डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा दबदबा कायम राहिला आहे..