ब्रेन स्ट्रोक, स्लिप डिस्क, मणक्याचा त्रास... आता बुलढाणा-मेहकरमध्येच तज्ज्ञ उपचाराची संधी! १८ जुलै रोजी छत्रपती संभाजी नगरच्या सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. कपिल मुळे यांची विशेष ओपीडी..आजच करा नोंदणी! 

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेंदू व मणक्याशी संबंधित आजारांवर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. केअर सिग्मा हॉस्पिटल्स, छत्रपती संभाजीनगर येथील मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. कपिल मुळे यांची विशेष ओपीडी आता दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी बुलढाणा आणि मेहकर येथे उपलब्ध होत आहे.

शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी बुलढाण्यातील मोरे हॉस्पिटल येथे दुपारी १२ ते २ या वेळेत, तर मेहकर येथील मातोश्री हॉस्पिटल व राठोड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.

या ओपीडीमध्ये ब्रेन ट्यूमर, ब्रेन स्ट्रोक, मेंदूतील रक्तस्राव, मणक्याचा त्रास, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायसिस, मान व कंबरदुखी, हात-पायातील नसांचे आजार तसेच मेंदू व मणक्याशी संबंधित विविध शस्त्रक्रियांबाबत तज्ज्ञ उपचार व सल्ला उपलब्ध राहणार आहे.

अचानक हात-पाय सुन्न होणे, सतत डोकेदुखी, बोलण्यात अडचण, मान किंवा कंबरदुखी, हात-पायात मुंग्या येणे अथवा चालताना त्रास होत असल्यास वेळ न दवडता तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अपॉइंटमेंटसाठी ९९२०१३१७६५, ९६८९७१६२८२ किंवा ७८७५६ ५०५५४ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.केअर सिग्मा हॉस्पिटल्स, छत्रपती संभाजीनगरने रुग्णांना त्यांच्या शहरातच तज्ज्ञ उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिल्याने बुलढाणा आणि मेहकर परिसरातील रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे.