BIG NEWS बुलढाण्याच्या कोणत्या मदरशात लपले "येमेन" चे नागरिक ? मंत्री नितेश राणे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट! म्हणाले, तिथे आतंकवादी घडवण्याचे काम...
Jul 19, 2025, 14:05 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मंत्री नितेश राणे त्यांच्या वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असतात. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना अतिशय खळबजनक विधान केले. बुलढाणातील एका मदरशात येमेन येथील नागरिक लपल्याचा दावा राणे यांनी केला आहे.
पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना नितेश राणे बोलत होते. शाळा बंद केल्यापेक्षा मदरसे बंद करा. तिथे आतंकवादी घडवण्याचे काम होते. बुलढाण्याच्या एका मदरशात येमेनचे नागरिक लपले आहेत. तिथे जिलेटीनच्या कांड्या सापडतात, तलवारी सापडतात.. आतंकवादी घडवण्याचे काम तिथे होते असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. राणे यांच्या दाव्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे... बुलढाण्यातील "तो" मदरसा कोणता? याबद्दल विविध तर्कवितर्क लढवल्या जात आहेत..