कि.राजा जिल्हा परिषद सर्कलाला येणार "अच्छे दिन"! विनायक भानुसे यांना उमेदवारी द्या; जनमानसातून उमटतोय परिवर्तनाचा सूर!

शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करणारा माणूस मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बळ! आ.मनोज कायंदे भानुसेंना देणार बळ?
 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय... किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कल ला आता चांगले दिवस येणार आहेत. त्याला कारण आहे, विनायक तुकाराम भानुसे पाटील....! विद्यार्थी आणि शेतकरी चळवळीत लढणारा हा लढवय्या कार्यकर्ता आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाला... अर्थात ते मायबाप जनतेच्या आग्रहास्तव...विनायक भानुसे पाटील हे नाव आहे संघर्षाच..अगदी सर्वसामान्य परिवारातून येत असलेल्या विनायक पाटील यांनी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी उभारलेला लढा इथली जनता विसरू शकत नाही. आता विनायक भानुसे पाटील यांनी आ. मनोज कायंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.अर्थात होत विनायक पाटील हेच किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कल मधून उमेदवार असावेत असा एकमुखी सूर आता जनमानसातून उमटू लागला आहे.
"शेतकऱ्यांचा आवाज, विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक – विनायक भानुसे आता रणांगणात!" कि. राजा जिल्हा परिषद सर्कलमधून उमेदवारीची अधिकृत घोषणा; जनतेत उत्साहाची लाट!

    एम.ए., बी.एड., एम.फिल. अशी उच्च शिक्षणाची पात्रता असलेले विनायक भानुसे हे ‘राजमुद्रा करिअर पॉईंट’ या माध्यमातून गेली १२ वर्षे ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करत आहेत.
विशेष म्हणजे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू करून आशेचा किरण पेटवला आहे.

शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेला लढवय्या!

गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे विनायक भानुसे हे पिक विमा, दुष्काळी अनुदान, कर्जमाफी तसेच सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळावा यासाठी तहसीलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने, रस्ता रोको आणि निवेदनं देत आले आहेत.
शेतकरी पुत्र असल्याने त्यांना शेतीच्या वेदना जवळून कळतात, आणि हीच जाणिव त्यांना राजकारणात उतरायला प्रेरणा देणारी ठरली आहे.

वीज-पाणी प्रश्नांवर आघाडीवर!

किनगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना नियमित वीज आणि पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्यांनी एमएसईबी आणि खडकपूर्णा प्रकल्प प्रशासनाला वारंवार धारेवर धरले.
त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांमुळे अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली.

तरुणाईचा मार्गदर्शक आणि रोजगारनिर्मितीचा पुढारी

भानुसे यांच्या उपक्रमांतून आजपर्यंत १५०० हून अधिक विद्यार्थी पोलिस, आर्मी, नेव्ही आणि विविध शासकीय पदांवर कार्यरत झाले आहेत.
ग्रामीण युवकांना खाजगी क्षेत्रात रोजगार मिळावा यासाठी त्यांनी विविध रोजगार मेळावे आयोजित केले, ज्यातून शेकडो तरुणांना नोकरीच्या संधी मिळाल्या.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरांद्वारे त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांची गोडी आणि आत्मविश्वास निर्माण केला आहे.

आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी

विनायक भानुसे यांनी विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी आणि रोग निदान मोहिमा राबवून समाजसेवेचे व्रत जपले आहे.कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या अडचणींविरोधात त्यांनी मुंडन आंदोलन आणि वर्धा-सेवाग्राम पदयात्रा काढून अभ्यासिका सुरू करण्याची मागणी केली होती.

"राजकारण हे सेवेसाठी, सत्तेसाठी नव्हे!"

"शिक्षण, रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या त्रिसूत्रीवर माझा विश्वास आहे. लोकांसाठी जे आजवर लढलो, त्याच ताकदीने पुढेही काम करत राहीन," असे विनायक भानुसे यांनी सांगितले.

"जनतेच्या मनातील उमेदवार!"

विनायक भानुसे यांच्या उमेदवारीमुळे किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
तरुणाईपासून शेतकरी संघटनांपर्यंत सर्वत्र त्यांच्या पाठिंब्याची चर्चा आहे.
"ज्याने शिक्षण आणि समाजकारण दोन्ही जोपासले, तोच चेहरा जिल्हा परिषद सर्कलचा  विकास घडवू शकतो," असा जनतेचा सूर आहे.