नक्षलग्रस्त भागातील सेवेसाठी बुलढाण्यातील ४ पोलिसांना ‘विशेष सेवा पदक’!
प्रताप विजय बाजड यांनी गडचिरोलीत मार्च २०२१ ते जुलै २०२४ दरम्यान नक्षलविरोधी मोहीम, निवडणुका शांततेत पार पाडणे, मुला-मुलींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित. नक्षलग्रस्त भागात ग्रंथालय अभियान राबवून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ केला.या कालावधीत ७९ नक्षल मुले आणि मुली शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. रामेश्वर किसन आंधळे यांनी २०१२ ते २०२४ दरम्यान हेड्री येथे कार्यरत राहून नक्षलविरोधी अभियान राबवले. कम्युनिटी पोलिसिंगद्वारे शासनाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवून पोलिसांची प्रतिमा उंचावली.
सुपाजी निनाजी तायडे यांनी २०११ ते २०२४ या काळात ईन्ट सेलमध्ये कार्यरत राहून गुप्त माहिती गोळा करून वरिष्ठांना सादर केल्याने नक्षल कारवाया रोखण्यात यश मिळाले.
पंचगंगा भगवान भोजने या २०१० ते २०२२ दरम्यान निवडणूक शाखा व पोलीस कल्याण शाखेत कार्य हाेत्या. त्यांनी नक्षलग्रस्त भागात सुरक्षेसाठी योगदान दिले. या अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी सुनिल अंबूलकर व पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण पाबरा यांनी अभिनंदन केले आहे.