गुळभेली येथे १२ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ फेसबुकवर अपलोड, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल; धामणगाव बढे पोलिसांची कारवाई; पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा...
मिळालेल्या माहितीनुसार, गुळभेली येथील पीडित मुलगी ही १२ वर्षे ६ महिने वयाची आहे. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ती घरातील कामासाठी गावातील दुकानात जात असताना आरोपी नितीन राजू चव्हाण (वय २४, रा. गुळभेली) याने तिचा पाठलाग केला. निर्जन ठिकाणी पोहोचताच त्याने बळजबरीने तिचा हात धरून तिला गावातील राम बळीराम राठोड यांच्या घरात नेले.
तेथे आरोपीने पीडितेचे तोंड दाबून, “ओरडलीस तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,” अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नितीन चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४(१), ७६, ७७, ७८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ई), ६७(अ), ६७(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.