सोलापूरची ईशा गाजवतेय मिस इंडिया २०२१ स्‍पर्धा

जयपूर ः मिस इंडिया २०२१ स्पर्धेसाठी सोलापूरची ईशा अभय वैद्य हिची निवड झाली आहे. सोलापूरमधून अशा स्पर्धेसाठी निवडली जाणारी ईशा पहिलीच मुलगी ठरली आहे. स्पर्धेची पहिली फेरी जयपुरात पार पडली. दुसरी फेरी दिल्लीत सुरू आहे. ईशाचे वडील अभय डॉक्टर आहेत. हे कुटुंब सध्या पुण्यात राहते. सोलापूरमधील ज्ञान प्रबोधिनी शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले. सांगलीत तिचे …
 

जयपूर ः मिस इंडिया २०२१ स्‍पर्धेसाठी सोलापूरची ईशा अभय वैद्य हिची निवड झाली आहे. सोलापूरमधून अशा स्‍पर्धेसाठी निवडली जाणारी ईशा पहिलीच मुलगी ठरली आहे. स्पर्धेची पहिली फेरी जयपुरात पार पडली. दुसरी फेरी दिल्लीत सुरू आहे.

ईशाचे वडील अभय डॉक्‍टर आहेत. हे कुटुंब सध्या पुण्यात राहते. सोलापूरमधील ज्ञान प्रबोधिनी शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले. सांगलीत तिचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. ती स्वतः दंतचिकित्सक असून, ईशा मिस इंडिया ठरली तर मिस इंटरनॅशनल, मिस मल्टीनॅशनल, मिस ग्रंड मल्टीस्टेट नॅशनल आणि टुरिझम इन एशिया पॅसिफिक आदी स्पर्धांमध्ये तिला भाग घेता येईल.

अभय वैद्य म्हणाले, की या स्‍पर्धा ब्युटी वुईथ ब्रेन संकल्पनेवर आधारित असतात. छोट्या शहरातून मुलींनी अशा स्पर्धांसाठी पुढे यायला पाहिजेत. तरच महाराष्ट्रातील टॅलेंट जगासमोर येईल. न्यूट्रिशन आणि योगातही ईशा स्वारस्य आहे.