“सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत भगवान बुद्धांची विटंबना

ठाणे : एका खासगी चॅनेलवर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सुरू आहे. कौटुंबिक स्वरुपाच्या या मालिकेतील १४ सप्टेंबरच्या भागात तथागत भगवान गौतम बुद्धांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली आहे. या मालिकेतील सँडी नावाच्या महिला पात्राने निळे ब्लाऊज परिधान केले असून, त्यावर पांढऱ्या रंगात भगवान बुद्धांचे छायाचित्र छापण्यात …
 

ठाणे : एका खासगी चॅनेलवर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सुरू आहे. कौटुंबिक स्वरुपाच्या या मालिकेतील १४ सप्टेंबरच्या भागात तथागत भगवान गौतम बुद्धांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली आहे.

या मालिकेतील सँडी नावाच्या महिला पात्राने निळे ब्लाऊज परिधान केले असून, त्यावर पांढऱ्या रंगात भगवान बुद्धांचे छायाचित्र छापण्यात आले. भगवान गौतम बुद्ध हे जगभरातील बौद्धांसाठी पूजनीय आहेत. असे असताना जाणीवपूर्वक चॅनेल आणि मालिकेच्या निर्मात्याने ब्‍लाऊजवर छायाचित्र छापून बांधवांच्या भावना दुखावण्यात आल्याचा आरोप इंदिसे यांनी केला आहे. चॅनेल, मालिका निर्माता आणि मालिकेच्या ड्रेस डिझायनरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.