सिद्धार्थ विचित्र वागत होता, नात्यात भविष्य नव्‍हते… म्‍हणून दीपिकाने केला ब्रेकअप!

मुंबई ः अभिनेत्री दीपिका पदुकोनने तिच्या सौंदर्याने व अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओम शांती ओममध्ये काम केल्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनेता रणबीर कपूरसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याने दीपिका एकटी पडली होती. हा ब्रेकअपनंतरचा काळ तिच्यासाठी खूप वाईट असल्याने तिने अनेकदा सांगितले. एकाकी पडलेल्या दीपिकाला कुणाची तरी …
 

मुंबई ः अभिनेत्री दीपिका पदुकोनने तिच्या सौंदर्याने व अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओम शांती ओममध्ये काम केल्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनेता रणबीर कपूरसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याने दीपिका एकटी पडली होती. हा ब्रेकअपनंतरचा काळ तिच्यासाठी खूप वाईट असल्याने तिने अनेकदा सांगितले.

एकाकी पडलेल्या दीपिकाला कुणाची तरी साथ हवी होती. उद्योगपती विजय माल्ल्याच्या किंगफिशर कॅलेंडरची दीपिका मॉडेल होती. त्याचवेळी तिचे सूर विजय माल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्यासोबत जुळले. सिद्धार्थ माल्याची तिच्या आयुष्यात एंट्री झाली. काही काळ एकत्र घालविल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. दीपिकाचे हे दुसरे ब्रेकअप होते. दोघांनी सुद्धा ब्रेकअप झाल्याचे मान्य केले. दीपिका यावर म्हणाली, की हे नाते टिकविण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. मात्र सिद्धार्थ विचित्र वागत होता. या नात्यात भविष्य दिसत नसल्याने आमचे ब्रेकअप झाल्याचे दीपिका म्हणाली होती.