सलमानची भाची होणार हिरोईन

बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा काही आता नवीन प्रकार नाही. एकाच परिवारातील अनेक जण बॉलिवूडमध्ये दिसतात. जवळच्या नातेवाइकांना बॉलिवूडमध्ये जागा देण्यासाठी निर्माते नेहमीच पुढे असतात. अशातच अभिनेता सलमान खानची भाची अलिजे अग्निहोत्री आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. अलिजे निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलिजे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. तिचे फोटो ती शेअर करते. तिचे …
 

बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा काही आता नवीन प्रकार नाही. एकाच परिवारातील अनेक जण बॉलिवूडमध्ये दिसतात. जवळच्या नातेवाइकांना बॉलिवूडमध्ये जागा देण्यासाठी निर्माते नेहमीच पुढे असतात. अशातच अभिनेता सलमान खानची भाची अलिजे अग्निहोत्री आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. अलिजे निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलिजे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. तिचे फोटो ती शेअर करते. तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. अलिजेने एका ज्वेलरीसाठी फोटोशूट केले होते. अलीकडेच ॲड फिचर फिल्मच्या चित्रिकरणाच्या सेटवर ती दिसून आल्याने ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचा चर्चांना जोर आला आहे.