शनाया प्रेमात! प्रियकरासोबत डेटवर
रसिका सुनील म्हणजे माझ्या नवर्याची बायको मालिकेतील शनाया… घराघरात या शनायाची अर्थात रसिकाची वेगळी ओळख आहे. मालिकेत ती भलेही विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडलेली दाखवली असेल पण खर्या आयुष्यात असे काही नाही बरं का. ती प्रेमात आहे, पण अविवाहिताच्या. सध्या ती लॉस एंजिलिसमध्ये या आपल्या प्रियकरासोबत आहे. त्याचं नाव आहे आदित्य बिलागी. रसिका विदेशात डेटवर गेली खरी पण तिथे आजारी पडली आहे. त्यामुळे तिचा प्रियकर आदित्य तिची कशी काळजी घेतो, याचे रसभरीत वर्णनच तिने सोशल मीडियावर फोटो टाकून केले आहे. तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले, की मी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे आणि आदित्य माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतोय. जेवण असो किंवा औषधं सर्वकाही तो मला जागीच आणून देतोय. त्याच्यामुळे मला अजिबात घराची आठवण येत नाही. कारण मी घरी असल्यासारखंच तो सर्व गोष्टींची काळजी घेतोय. मी आता बरी आहे, असं तिने लिहिलं आहे. पोस्टमध्ये त्याने आदित्यचे आभारही मानले. रसिका प्रेमात असल्याची माहिती यापूर्वीच तिच्या चाहत्यांना मिळाली होती. आता दोघं लग्नाची गोड बातमी कधी देतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. काही असो पण गुरुपासून तिची सुटका झाली हे काही कमी आहे का?