रिचा चढ्ढाचा खळबळजनक खुलासा… माझाही गैरफायदा उचलला!

जेव्हा मी कलाक्षेत्रात नवीन होते तेव्हा खूपच निरागस होते. मला कुणाच्या डोक्यात आपल्याबद्दल काय चालू आहे हेही कळत नव्हते. त्याचा फायदा अनेकांनी उचलला आणि करिअर उंचाविण्याच्या नावाखाली माझा गैरफायदा उचलला, असा खळबळजनक खुलासा अभिनेत्री रिचा चढ्ढाने केला आहे. हे सांगताना तिने थेट नामोल्लेख केलेला नाही. पण हे सर्व धोकादायक होतं, तरीही मी त्यातून सावरले, असे …
 

जेव्हा मी कलाक्षेत्रात नवीन होते तेव्हा खूपच निरागस होते. मला कुणाच्या डोक्यात आपल्याबद्दल काय चालू आहे हेही कळत नव्हते. त्याचा फायदा अनेकांनी उचलला आणि करिअर उंचाविण्याच्या नावाखाली माझा गैरफायदा उचलला, असा खळबळजनक खुलासा अभिनेत्री रिचा चढ्ढाने केला आहे. हे सांगताना तिने थेट नामोल्लेख केलेला नाही. पण हे सर्व धोकादायक होतं, तरीही मी त्यातून सावरले, असे ती म्हणाली.

बॉलिवूडमधील काल्पनिक पत्ता वांद्रे ते गोरेगाव असा असल्याचे ती म्हणाली. या दरम्यान काही लोक अशी काही कामे करून घेतात जी तुमच्यासाठी आयुष्यासाठी हानीकारक असतात, तुमच्या सन्मानाला बाधित करणारी असतात, असे रिचाने म्हटले आहे. मी ज्या वेळी या सर्व गोष्टींना तोंड दिलं तेव्हा अगदीच निरागस होते, असे ती म्हणाली.

जे ते करायला सांगत होते ते करिअरसाठी किती योग्य आहे, हे ते पटवून देत होते. त्यामुळे माझाही त्यांच्यावर विश्वास बसला, असे ती म्हणाली. भविष्यात हे बदलायचं असेल तर परिस्थितीत बदल घडवून आणणे गरजेचे आहे, असे रिचा म्हणाली. गेल्या मार्चमध्ये रिचा आणि अभिनेता अली फजल यांनी स्वतः प्रोडक्शन हाऊस सुरू केले असून, त्यांचा पहिला चित्रपट ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. दोघे जवळपास दोनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. दोघांच्या लग्नाची चर्चा सतत होत असते. कोरोनामुळे लग्न लांबल्याचेही दोघांच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे यंदा दोघे लग्न करतील, अशीही चर्चा आहे.