रविनाने विमान प्रवासात जे केलं ते वाचूनच म्हणाल, वाह वाह!
मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमधील कलाकार कधीकधी छोट्याछोट्या कृतीमधून मोठा संदेश देतात. त्यांच्या चाहत्यांचा वर्ग मोठा असल्याने त्याचा समाजावर चांगल परिणामदेखील होतो. कोरोनाविरोधातील लढ्यामध्येही बॉलिवूडमधील अनेक कलाकार स्वतःच्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत अभिनेता सोून सूद याने तर लाखो रुपये पदरमोड करुन कोरोनाकाळात अनेकांना मदत केली. त्याचे मीडियामध्ये खूप कौतूकदेखील झाले. अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील संदेश तर प्रत्येकाच्या फोनमध्ये व घरोघरी पोहोचला. आज बॉलिवूडधील अनेक कलाकार कोरोनाशी लढा देऊन परतले आहेत. तर काही जण कोरोना झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत.अशात अभिनेत्री रविना टंडन हिने आपल्या छोट्या कृतीमधून मोठा संदेश दिला आहे. रविना टंडन हिने नुकताच विमान प्रवासाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.तत तिने विमानात जागेवर बसण्यापूर्वी तिची सीट स्वत: होऊन सॅनिटाईझ केली.एवढेच नव्हे तर तिने त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियात टाकला आहे. त्यासोबत तिने म्हटले आहे की, हा कदाचित माझा वेडेपणा आहे. पण चांगलेच आहे. कोरोनापासून प्रत्येकानेच काळजी व योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे आपण सर्वजण स्वतःची आणि दुसर्यांचीही काळजी घेऊ यात. तिच्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले आहे.