…म्‍हणून अक्षय, शाहरुख, सलमान करत नाहीत प्रियांका चोप्रासोबत काम!

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रियांका चोप्रा प्रसिद्ध आहे. सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने आतापर्यंत अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही अभिनेत्यांसोबत काम करताना दिसत नाही. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षयकुमार आणि प्रियांका सोबत दिसत नाहीत. सलमान खान, शाहरुख खान आणि अामिर खानसुद्धा तिच्यासोबत काम करताना दिसत नाहीत. …
 

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रियांका चोप्रा प्रसिद्ध आहे. सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने आतापर्यंत अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही अभिनेत्यांसोबत काम करताना दिसत नाही. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षयकुमार आणि प्रियांका सोबत दिसत नाहीत. सलमान खान, शाहरुख खान आणि अामिर खानसुद्धा तिच्‍यासोबत काम करताना दिसत नाहीत. याचा शोध घेतला असता कारणं वेगवेगळी असल्याचे समोर आले.

पदार्पणाच्या सुरुवातीलाच प्रियांकाने अक्षय कुमारसोबत काम केले होते. दोघांची जोडी सुपरहिट ठरली. दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे अक्षयच्या पत्नीने प्रियांकासोबत काम करू नको, अशी ताकीद त्‍याला दिली. परिणामी अक्षयने प्रियांकासोबत काम टाळणे सुरू केले. शाहरुख आणि प्रियांकाचेही तसेच झाले. दोघांनी सलग दोन वर्षे एकत्र काम केले. अवॉर्ड शोचे सूत्रसंचालन आणि आयपीएल मॅचच्या वेळेस ते एकत्र दिसायचे. त्यामुळे शाहरुखची पत्नी गौरी खवळली. स्वतःचे घर टिकविण्यासाठी प्रियांकासोबत काम न करण्याचा निर्णय शाहरुखने घेतला.

सलमान खानसोबत प्रियांकाने मुझसे शादी करोगी, गॉड तुस्सी ग्रेट हो या चित्रपटांत काम केले. मात्र मिसेस खन्‍ना या चित्रपटात सलमानसोबत काम करायला प्रियांकाने नकार दिला. त्यामुळे सलमानला राग आला. त्यामुळे यापुढे कोणत्याही चित्रपटासाठी प्रियांकाला विचारायचे नाही, असे सलमानने ठरवले. आमिर खान आणि प्रियांकाने आतापर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केले नाही. आमिर आणि प्रियांकात कुठल्या कारणावरून वाद आहे हे समोर येऊ शकले नाही. मात्र प्रियांकाचे नाव सूचवल्यावर अामिरने अनेकदा नकार दिला आहे.