ब्राची पट्टी दिसल्यानं “ही’ अभिनेत्री ट्रोल
मुंबई : छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या “तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेत रिटा रिपोर्टरचं काम करणारी प्रिया आहुजा तिच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेनं आणि सहजसुंदर अभिनयानं चांगलीच लोकप्रिय झाली आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिच्या ग्लॅमरस फोटोंच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेले आणि भलतेच चर्चेत आलेले फोटो प्रियाचा नवरा आणि मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदा यांनी काढले आहेत. प्रियाचे अतिशय ग्लॅमरस अंदाजातील फोटो तिच्या चाहत्यांना भलतेच आवडल्याने तिला चाहत्यांनी भरभरून लाइक दिल्या. त्यावरच्या प्रतिक्रिया मात्र चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही आहेत. या फोटोंत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसत असल्याने काहींनी तिला ट्रोल केले.
अभिनेत्री प्रिया आहुजा हिने तिच्या इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले. तिनं त्या फोटोंना सुंदर कॅप्शन दिलं. “जे काही तुमच्या आत्म्याला समाधान देणार आहे ते करा,’ असं ती म्हणते. या फोटोंत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसते. त्यामुळं काहींनी तिला ट्रोल केले. कलाकार कायमच ट्रोल होत असतात. त्यात नवीन काही नाही; परंतु जेव्हा एका ट्रोलरनं मर्यादा सोडली. प्रियावर अतिशय खालच्या भाषेत कमेन्ट केली, तेव्हा तिचा पती मालव संतापला. त्यांनी कमेंट करणाऱ्याला सडेतोड उत्तर दिलं. “हेच तुमच्या आई किंवा बहिणीला बोलून बघा, पाहा त्यांची प्रतिक्रिया कशी येतेय,’ या भाषेत त्यानं यूझरला सुनावलं.