बिकिनी घालण्यास नकार दिल्याने संपले करिअर
तो काळच असा होता की थोडंफार बोल्ड दृश्यही अतिरेकी वाटायचं. तिथे मला चक्क बिकिन घालण्यास सांगितल्याने मी थेट चित्रपटच सोडून दिला. परिणामी मला नंतर कामे मिळाली नाहीत आणि करिअर संपलं, अशी माहिती 90 च्या दशकातील सुपरस्टार आयशा जुल्का हिने दिली.
जो जीता वो सिकंदर या आमिर खानच्या चित्रपटातून आयशा मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर तिला अनेक चांगले चित्रपट मिळाले आणि ती सुपरस्टार झाली. पण प्रेम कैदी हा चित्रपटच तिच्या करिअरसाठी जणू काळ बनून आला होता. या चित्रपटात दिग्ददर्शकाने बिकिनी परिधान करण्यास सांगितली होती. मात्र तो काळ असा होता की ते माझ्यासाठी तरी अशक्य होतं. मी नकार दिला, असे आयशा म्हणाली. त्यामुळे करिअर संपल्याची कबुली तिने दिली. ती म्हणाली, की प्रेम कैदी चित्रपटाची पटकथा वाचताच मी काम करण्यास होकार दिला. मात्र दिग्ददर्शकाने बिकिनी परिधान करण्याची अट माझ्यासमोर ठेवली होती. मला चित्रपटातून बाहेर केलं गेलं. या चित्रपटानंतर अनेक चांगले चित्रपटही माझ्या हातून गेले. प्रेम कैदी चित्रपट 1991 साली आला होता. यात करिश्मा कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. जबरदस्त गाणी आणि पटकथेच्या जोरावर चित्रपट सुरहिट ठरला होता. या चित्रपटाला नकार दिल्यानंतर आयशानं खिलाडी, वक्त हमारा है, हिंमतवाला, चाची 420 यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु या चित्रपटांमध्ये तिला प्रामुख्याने सहाय्यक भूमिका साकारण्याची संधी मिळाली.