बाप रे! ‘या’ अभिनेत्रीची किती ही मालमत्ता!
एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं आता हाॅलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. आता ती अमेरिकेतील लाॅस एंजिल्समध्ये स्थायिक झाली असून, तिथं तिनं हाॅटेलही सुरू केलं आहे. त्यामुळं बाॅलिवूडची ‘देसी गर्ल’ आता परदेशी झाली असून, तिनं मुंबईचा निरोप घेतला आहे. मुंबईचे दोन फ्लॅट तिनं दहा कोटी रुपयांना विकले आहेत.
निक जोनससोबत लग्न केल्यानंतर प्रियंका अमेरिकेत स्थायिक झाली असली, तरी तिच्या लग्नाचे सर्व विधी मुंबईतल्या याच घरांमध्ये झाले. या घरांसोबत तिच्या लग्नाच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या होत्या; पण आता तिनं घराची विक्री केली आहे. प्रियांका ही बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक असून, भारतात अनेक ठिकाणी तिच्या स्वतःच्या मालमत्ता आहेत. प्रियांकाच्या मुंबईतील दोन फ्लॅटची विक्री तिच्या आईनं केली. तिची ऑफिस भाड्यानं दिली आहेत. ओशिवारामधील तिच्या आॅफिसचं दरमहा भाडं दोन लाख ११ हजार रुपये आहे. वर्सोवा अंधेरीमधल्या राज क्लासिक प्रॉपर्टीला सात कोटींमध्ये विकलं आहे. आणखी एक अपार्टमेंट तिनं तीन कोटींना विकलं. गेल्या वर्षी प्रियांकानं काही प्रॉपर्टी विकल्या होत्या. लोखंडवाला कॉम्प्लेक्समधले करण अपार्टमेंटमध्ये असलेलं घर विकलं. मुंबई, गोवा आणि अमेरिकेतसुद्धा प्रियांकाच्या प्रॉपर्टी आहेत. अमेरिकेत तिनं सोना हे नव रेस्टॉरंट सुरू केलं. तिच्या या रेस्टॉरंटंमध्ये भारतीय पदार्थ मिळतात. तिनं अमेरिकेत बेव्हेरली हिल्स इथं आलिशान घर खरेदी केलं आहे.