फिल्मी दुनिया : सैफचा मुलगा हिरो नाही बनणार!

बॉलिवूड अभिनेता सैफअली खानचा मुलगा इब्राहिम खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. खुद्द सैफअली खान यानेच ही माहिती दिली आहे. तो बॉलिवूडमध्ये येणार असला तरी अभिनय करणार नाही, असेही सैफ अली खान म्हणाला. अभिनयाऐवजी इब्राहिम करण जोहरचा असिस्टंट म्हणून काम करणार असल्याचे सैफने स्पष्ट केले. “रॉकी और रानी : प्रेम कहाणी’ या करणं जोहरच्या सिनेमात अनेक …
 

बॉलिवूड अभिनेता सैफअली खानचा मुलगा इब्राहिम खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. खुद्द सैफअली खान यानेच ही माहिती दिली आहे. तो बॉलिवूडमध्ये येणार असला तरी अभिनय करणार नाही, असेही सैफ अली खान म्हणाला.

अभिनयाऐवजी इब्राहिम करण जोहरचा असिस्टंट म्हणून काम करणार असल्याचे सैफने स्पष्ट केले. “रॉकी और रानी : प्रेम कहाणी’ या करणं जोहरच्या सिनेमात अनेक स्टार किड्स म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्यांची मुले दिसणार आहेत. रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी असे अनेक मोठे स्टार या सिनेमात दिसणार आहेत. एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला, की इब्राहिमसोबत त्याच्या कामाबद्दल मी नेहमी चर्चा करतो. सारा मोठी असल्याने तिच्यासोबत सुद्धा एक वेगळंच नातं आहे, असं सैफ म्हणाला. मात्र सैफ अली खानची पत्नी करिना कपूर म्हणते, की माझ्या मुलांनी सिनेस्टार बनू नये. तैमूरला माऊंट एव्हरेस्ट सर करायचं असेल तर मला आवडेल, असं करिना म्हणाली.