पती तुरुंगात तरी शिल्पा परतली कामावर!

पती राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे सध्या शिल्पा शेट्टी प्रचंड अडचणीत आहे. विशेष म्हणजे राज कुंद्राचे एवढे सारे काळे धंदे समोर येऊनही तिने अजून त्याची पाठराखणच चालवली आहे. त्यामुळे तिचाही त्याच्या कृत्यात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तिच्याविरोधात पोलिसांना तूर्त तरी कोणताही पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे ती बिनधास्त आहे. चित्रपटात काम देण्याचे आमिष …
 

पती राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे सध्या शिल्पा शेट्टी प्रचंड अडचणीत आहे. विशेष म्हणजे राज कुंद्राचे एवढे सारे काळे धंदे समोर येऊनही तिने अजून त्याची पाठराखणच चालवली आहे. त्यामुळे तिचाही त्याच्या कृत्यात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तिच्याविरोधात पोलिसांना तूर्त तरी कोणताही पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे ती बिनधास्त आहे. चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून तिचा पती राज नवोदित अभिनेत्रींकडून पॉर्न चित्रपटात काम करून घ्यायचा, असा त्याच्यावर आरोप आहे. तशा तक्रारीही बऱ्याच नवोदित अभिनेत्रींनी केल्या आहेत. न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जे सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल. माझा पती निर्दोष आहे, असे शिल्पा म्हणत आहे. दुसरीकडे तिने या संकटाला बाजूला सोडत कामाला सुरुवात केली आहे. ‘सुपर डान्सर ४’ च्या चित्रीकरणाला शिल्पाने पुन्हा सुरुवात केली आहे. ती या शोची परीक्षक म्हणून काम पाहात आहे. ती नसल्याने तिच्या जागी काही सेलिब्रिटींना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आता ती परतल्याने शोच्या निर्मात्याने आनंद व्यक्त केला आहे. शिल्पाच या सीझनच्या शेवटपर्यंत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राज कुंद्रा तुरूंगात आहे. तरीही शिल्पा कामावर लक्ष केंद्रीत करत असल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले आहे. शिल्पा शेट्टी अडचणीत असल्यामुळे या शोमध्ये दिसली नाही. त्यामुळे रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, सोनाली बेंद्रे, मौसमी चॅटर्जी, जॅकी श्रॉफ, संगीता बिजलानी यांनी शोमध्ये हजेरी लावली.