नेहा धुपिया पुन्हा आई झाली बरं…; दुसऱ्या बाळाला जन्म!
अभिनेत्री नेहा धुपियाने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. तिचा पती अंगद बेदीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून चाहत्यांना ही शुभवार्ता दिली. नेहा आणि अंगदचे अनेकांनी कौतुक केले आहे. अंगदने त्याचा आणि नेहाचा फोटो शेअर केला व त्याखाली लिहिले की, देवाच्या आशीर्वादाने आज आम्हाला मुलगा झाला. बाळाची आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. आता यापुढील प्रवास आमच्या चौघांसाठी नक्कीच अविस्मरणीय राहणार आहे, असे त्याने म्हटले आहे. दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची गोड बातमी नेहाने यापूर्वीच चाहत्यांना दिली होती. सध्या नेहाचे वय ४० आहे. २००२ साली तिने मिस इंडियाचा किताब नावावर केला होता. कयामत या चित्रपटातून २००३ मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. १० मे २०१८ मध्ये ती अंगद बेदीशी विवाहबद्ध झाली होती.