दोघांत तिसरी… इमरान मैत्रिणीच्या प्रेमात!
करिअर ऐन भरात आले असताना आणि ज्यावेळी लाखो तरुणी त्याच्यावर फिदा होत्या त्यावेळी अभिनेता इमरान खानने आपली प्रेयसी अवंतिका मलिकसोबत सातफेरे घेतले होते. त्यामुळे दोघांच्या प्रेमाबद्दल भलतेच गोडवे गायले गेले. मात्र आता दोघांच्या प्रेमाला अन् संसाराला नजर लागल्याचे चित्र आहे.
इमरान काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनला डेट करत असल्याची चर्चा असून, याचमुळे अवंतिकाचे खटकले आहे. लेखा आणि इमरानने मटरु की बिजली का मन डोला या चित्रपटात एकत्र काम केले आहे. यात लेखाने इमरानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे लेखा विवाहित असून, तिचा पती आणि इमरान मित्र आहेत. त्यामुळेच लेखाशी त्याचे संबंध वाढल्याचे सांगितले जात आहे. अवंतिका आणि इमरानने 2011 मध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगीदेखील आहे. सध्या लेखामुळे वाद झाल्याने अवंतिकाने घर सोडले आहे.