दंगल गर्ल फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
मुंबई ः बॉलिवूड अभिनेत्री आणि दंगल गर्ल म्हणून ओळख असलेली फातिमा सना शेख नेहमीच चर्चेत असते. आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर आमिर खानची तिची जवळील वाढल्याची चर्चा होत होती. सध्या ती तिच्या मुलाखतीने चर्चेत आली आहे. यामध्ये तिने तिचे लहानपणी लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले. ती ३ वर्षांची असतांनाच तिचा विनयभंग करण्यात आला होता. याशिवाय …
Sep 19, 2021, 16:52 IST
मुंबई ः बॉलिवूड अभिनेत्री आणि दंगल गर्ल म्हणून ओळख असलेली फातिमा सना शेख नेहमीच चर्चेत असते. आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर आमिर खानची तिची जवळील वाढल्याची चर्चा होत होती. सध्या ती तिच्या मुलाखतीने चर्चेत आली आहे. यामध्ये तिने तिचे लहानपणी लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले. ती ३ वर्षांची असतांनाच तिचा विनयभंग करण्यात आला होता. याशिवाय बॉलिवूडमध्ये काम मिळवताना तिला कास्टिंगमुळे काम गमवावे लागले असल्याचेही तिने सांगितले. तू अभिनेत्री बनू शकणार नाही. ऐश्वर्या, दीपिकासारखी दिसत नाही, असे टोमणे बऱ्याचदा ऐकले, असे फातिमा म्हणाली. शरीरसंबंध ठेवले तरच काम मिळेल असे मला बऱ्याचदा सांगितले गेले, असेही ती म्हणाली.