चाहत्याने केली विचित्र मागणी, पूजा हेगडेने त्याची बोलतीच बंद केली!
चित्रपटात काही दृश्ये प्रोफेशनचा भाग म्हणून नायिका देत असतात. पण चाहत्यांचा वेगळाच समज होतो आणि त्यांना नायिका म्हणजे पैशासाठी काहीही करतात, असे वाटू लागते. पण वास्तवात तसे नसते. असे चाहते स्वतःची विकृती वेळोवेळी सिद्धही करत असतात. अभिनेत्री पूजा हेगडे हिलादेखील अशाच एका चाहत्याचा कटू अनुभव आला. पूजा इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधत होती. यावेळी पूजाने कधी न शेअर केलेले अनेक फोटो टाकले. हे फोटो एका यूजरची विकृती जागृत झाली. त्याने तिच्याकडे चक्क न्यूड फोटोची मागणी केली. पूजाने ही मागणी पाहून संयम राखला आणि त्याची मागणी अनोख्या पद्धतीने पूर्ण केली. तिने पायाचा फोटो शेअर केला. त्यावर तिने नंगे पाव असे कॅप्शनही दिले. तो फोटो पाहून चाहत्याची बोलतीच बंद झाली. पूजाने मोहजोंदारो चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती हृतिक रोशनसोबत दिसली होती. आता ती लवकरच सुपरस्टार प्रभाससोबत राधेश्याम चित्रपटात झळकणार आहेत.