ऐश्वर्याने अभिषेकला ठेवले होते दोन रात्र बेडरूमबाहेर!

मुंबई ः ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन ही जोडी बॉलिवूडचे विशेष आकर्षण म्हटले जाते. दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे. मात्र तुम्हाला माहीत नसेल, की एकमेकांना सोडून कधीही राहू न शकणाऱ्या या दोघांत एकदा इतके भांडण झाले की चक्क दोघे दोन रात्री एकमेकांपासून वेगळे झोपले होते. ऐश्वर्यानेच अभिषेकला दोन रात्री बेडरूममध्ये येण्यास मनाई केली होती. ऐश्वर्या …
 

मुंबई ः ऐश्वर्या राय-बच्‍चन आणि अभिषेक बच्‍चन ही जोडी बॉलिवूडचे विशेष आकर्षण म्‍हटले जाते. दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे. मात्र तुम्‍हाला माहीत नसेल, की एकमेकांना सोडून कधीही राहू न शकणाऱ्या या दोघांत एकदा इतके भांडण झाले की चक्‍क दोघे दोन रात्री एकमेकांपासून वेगळे झोपले होते. ऐश्वर्यानेच अभिषेकला दोन रात्री बेडरूममध्ये येण्यास मनाई केली होती.

ऐश्वर्या संतप्‍त होती, रागाने लालबुंद झाली होती. तिने त्‍याच्‍याशी पूर्णपणे बोलणे बंद केले होते. भांडणाचं कारण तसं क्षुल्लक होतं, पण ऐश्वर्याचा गैरसमज झाल्याने या भांडणाने मोठे स्वरुप प्राप्‍त केले. २०१४ मध्ये अभिषेकने प्रो-कबड्डी लीग जिंकली होती. टीमचे प्रशिक्षण सुरू असताना तो चेन्नईत सत्यभामा विद्यापीठात गेला आणि विद्यापीठाचे संस्थापक कर्नल जेपीआयआर यांना भेटला होता. जेपीआयआर यांनी त्यांच्या कार्यालयात ट्रॉफी जमिनीवर ठेवलेल्या होत्या. त्‍या बघून अभिषेकला आश्चर्य वाटले.

त्‍याने न राहावून कारण विचारले. त्‍यावर कर्नलनी सांगितले, की जाणिवपूर्वक या ट्रॉफी जमिनीवर ठेवल्या आहेत. कारण ते कधीच पुरस्कारांना डोक्यात शिरू देत नाहीत. बसं हे ऐकलं आणि अभिषेकने घरी आल्यावर तेच केले. ऐश्वर्या आणि स्वतःला मिळालेले सर्व पुरस्कार त्‍याने जमिनीवर ठेवले. हे ऐश्वर्याने बघितले आणि तिला प्रचंड राग आला. पुरस्‍कार असे कुणी जमिनीवर ठेवतात असे म्‍हणून तिने जे झापायला सुरुवात केली, की अभिषेक काय म्‍हणतो हे ऐकायलाही तिला जणू शक्‍य नव्‍हते. तिला त्‍याला तसेच बेडरूम बाहेर काढले. दोन रात्र त्‍याला बेडरूममध्ये एंट्री नव्‍हती. राग शांत झाल्यावर ऐश्वर्याला त्‍याने समजावून सांगितलं तेव्‍हा ऐश्वर्याही खजील झाली.