उर्मिलाने घातली होती जॅकी श्रॉफची पांढरी बनियान!
१९९० च्या दशकातील अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या राजकारणात आहे. एकेकाळी मराठी आणि हिंदी सिनेमात उर्मिलाने केलेल्या भूमिका खूप गाजल्या होत्या. रंगीला चित्रपटसुद्धा खूप लोकप्रिय ठरला होता. चित्रपटातील तनहा-तनहा हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. या गाण्यात उर्मिलालाच्या बोल्ड लूकने चाहते घायाळ झाले होते. समुद्रावर डान्स करताना उर्मिलाने एक पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केल्याचे गाण्यात दिसते. मात्र हा ड्रेस नसून गाण्यावेळी उर्मिलाने जॅकी श्रॉफची पांढरी बनियान घातलेली होती. एका रिॲलिटी शोमध्ये तिने स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला आहे. जॅकीची बनियान घालणे हा खूप मजेशीर किस्सा होता. काहीतरी नॅचरल वाटेल असं करा, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. कपड्यांबद्दल चर्चा करत असताना तू माझी बनियान घाल, असं जॅकी म्हणाला. कसं दिसेल याची खात्री नसताना सर्व काही देवावर सोडलं. मात्र नंतर यासाठी माझं कौतुक झालं, असं उर्मिला म्हणाली.