आलिया भट्टही कोरोना पॉझिटिव्ह
मुंंबई : बॉलिवूडसह सेलिब्रेटी वर्ल्डमध्ये कोरोनाचा शिरकाव झपाट्याने होत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर हा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तो त्यातून बरा होऊन सुखरूप घरी परतला. आता त्याची मैत्रिण, अभिनेत्री आलिया भट्ट हीदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. विशेष म्हणजे तिने स्वतःच सोशल मीडियातून याबाबत माहिती पोस्ट केली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याचे सांगत तिने स्वत: ला होम क्वॉरंटाईन करवून घेतले आहे. माझी कोविड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी पुढील काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार असून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. तुम्ही सगळे माझ्यावर खूप प्रेम करता आणि माझी काळजी करता. तुमचे खूपखूप आभार. कृपया सावध राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आलिया भट्ट सध्या संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई कठियावाडी चित्रपटाचे शुटींग करत आहे. पण भन्साळी यांनाच काही दिवसांपूवी कोरोना झाला. त्यामुळे सिनेमाचे चित्रिकरण थांबविण्यता आले होता. आता आलियाच्या कोरोनामुळे त्यात पुन्हा ब्रेक लागणार आहे. आलिया- रणबीर यांची मै़त्री बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेचा विषय असून अनेक कार्यक्रमांत ते एकत्र फिरताना दिसून आले आहेत.
रॉबर्ट वाड्रा कोरोना पॉझिटिव्ह; प्रियंका गांधी होम क्वॉरंटाईन
दुसरीकडे सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रसि़द्ध उद्योगपती रॉबर्ट वाड्रा हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नी व काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी याही स्वतः होऊन होम क्वॉरंटाईन झाल्या आहेत.प्रियंका गांधी सध्या पाच राज्यांच्या प्रचारात व्यस्त होत्या. पण आता त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत.