अभिनेत्री दिया मिर्झा होणार आई

सोशल मीडियात फोटो शेअर करून दिली ‘गुड न्यूज’नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेली हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या घरी लवकरच नव्या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. होय दिया मिर्झा आई होणार असून तिने सोशल मीडियात एक सुंदर फोटो शेअर करून ही गुड न्यूज जगजाहीर केली आहे. उद्योगपती वैभव रेखीसोबत …
 

सोशल मीडियात फोटो शेअर करून दिली ‘गुड न्यूज’
नवी दिल्ली :
गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेली हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या घरी लवकरच नव्या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. होय दिया मिर्झा आई होणार असून तिने सोशल मीडियात एक सुंदर फोटो शेअर करून ही गुड न्यूज जगजाहीर केली आहे. उद्योगपती वैभव रेखीसोबत १५ फेब्रुवारी रोजी लग्न, मार्च महिन्यात ती हनिमूनसाठी विदेशात रवाना आणि १ एप्रिलरोजी गुड न्यूज देणारा ’बेबी बंब’ असलेला समुद्र किनार्‍यावरील फोटो असा दिया मिर्झाचा मजेशीर प्रवार सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला आहे. पण या गुड न्यूजसाठी अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या असून त्यात बॉलिवूडमधील तिच्यासोबत काम केलेल्या सहकलाकारांचा तसेच तिच्या चाहत्यांचाही समावेश आहे. उद्योगपती वैभव रेखी व दिया मिर्झा गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते.२०१९ मध्ये पती साहिलसोबत दिया मिर्झाचा कायदेशीर घटस्फोट झाला होता. त्यानंतर वैभव रेखी व तिची केमेस्ट्री जुळली होती. रेखीचेही हे दुसरे लग्न आहे. रहना है तेरे दिल मे या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात करणार्‍या दिया मिर्झाने अनेक हिंदी सिनेमांसह काही वेबसीरीजमधूनही काम केले आहे.