अभिनेत्री तापसी म्हणते, सहज संवादामुळं बोल्ड सीनही सहज केले!

अभिनेत्री तापसी पन्नूनं अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनय काैशल्यानं तिच्यामागं चित्रपट धावून येतात. तिच्या हसीन दिलरुबा या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटातील तिचं काम सर्वांच्या काैतुकास पात्र झालं आहे. आपल्या विचारांच्या विरुद्ध व्यक्तीरेखा साकारूनही तिनं ती जीवंत केली आहे. त्याचं कारण सांगताना पन्नू म्हणते, की भूमिका आत्मसात करीत नाही, तोपर्यंत …
 

अभिनेत्री तापसी पन्नूनं अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनय काैशल्यानं तिच्यामागं चित्रपट धावून येतात. तिच्या हसीन दिलरुबा या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटातील तिचं काम सर्वांच्या काैतुकास पात्र झालं आहे. आपल्या विचारांच्या विरुद्ध व्यक्तीरेखा साकारूनही तिनं ती जीवंत केली आहे. त्याचं कारण सांगताना पन्नू म्हणते, की भूमिका आत्मसात करीत नाही, तोपर्यंत ती वठविता येत नाही. भूमिकेत शिरावं लागतं. हसीन दिसरुबा’ या चित्रपटातील राणी कश्यप मीच आहे, असं समजून मी भूमिकेशी समरस झाले. बरेच दिवस ती भूमिका जगली, तरच तिचा काही अंश आपल्यात उतरतो. खरंतर वास्तविक जगणं आणि भूमिकेतील जगणं यात फरक करता आला पाहिजे. प्रत्येक भूमिकेतला अंश उतरत गेला, तर मूळ स्वभावातील काही राहण्याची शक्यता उरत नाही. हा तोटा असला, तरी भूमिका जगताना ती वास्तववादी होण्यासाठी तसं करावं लागतं. प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवण्यासाठी जे करणं आवश्यक असतं, ते मी करते. भूमिकेशी संवाद साधते. ते मी अत्यंत मेहनतीनं करते, असं तिनं गप्पांच्या ओघात सांगितलं. पन्नू म्हणाली, विक्रांत मेसी आणि हर्षवर्धन राणे यांच्याबरोबर यापूर्वी काम केलं नव्हतं. त्यांच्यासोबत काम करताना मोकळेपणा यावा, म्हणून त्यांच्यांशी संवाद साधत गेले. संहितेची गरज म्हणून जी दृश्य होती, ती मी केली. सहज संवादामुळं बोल्ड सीन करतानाही अवघडल्यासारखं वाटलं नाही.