अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लडकॅन्सर
पती अनुपम खेर यांनी दिली माहिती, तिच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन
मुंबई : खळखळून आणि मोठ्याने हसण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री तथा चंदिगड येथून विजयी झालेल्या भाजपच्या लोकसभा खासदार किरण खेर यांना कॅन्सरने गाठले आहे. त्यांना रक्ताचा दुर्मिळ प्रकारातील कॅन्सर झाला असून त्या सध्या त्याच्याशी लढा देत असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांचे पती अनुपम खेर यांनीच ही माहिती दिली असून किरण खेर ही लढवय्या असून ती यातून रिकव्हर होत आहे. तिच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, असे आवाहन करत अनुपम खेर यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे.
अनुपम खेर यांनी किरण खेर यांच्या आरोग्याबााबत माहिती देताना पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, किरण खेरच्या तब्येतीबाबत कोणतीही अफवा पसरू नये म्हणून ही पोस्ट शेअर करत आहे. मी अणि सिकंदर (अनुपम यांचा मुलगा) किरणला मल्टिपल मायलोमा,म्हणजे एक प्रकारचा दुर्मिळ ब्लड कॅन्सर झाला आहे. त्यावर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. आम्हाला विश्वास आहे की, किरण ठणठणीत बरी आणि आधीपेक्षा अधिक सक्षम होऊन परत येईल. किरण लढवय्या आहे. तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत. तुम्ही सगळे तिच्यासाठी प्रार्थना करा. ती लवकरच नक्की परत येईल. अनुपम खेर यांच्या या पोस्टनंतर किरण यांच्या तब्येतीसाठी अनेकांनी प्रार्थना केली आहे. यात त्यांचे चाहते तसेच बॉलिवूड व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकार, नेत्यांचा समावेश आहे.