अभिनेत्री कविता कौशिकला बनायचे नाही आई… कारण ऐकून तुम्हीच डोक्यावर माराल हात!
मुंबई ः खरंतर आई होणं ही प्रत्येक महिलेसाठी सर्वाधिक आनंदाची बाब असते. मातृत्वाचं सुख प्रत्येक महिलेला हवं असतं. मात्र प्रसिद्ध अभिनेत्री कविता कौशिकला मातृत्व नकोस वाटतं. अलीकडेच एका मुलाखतीत कविताला आई होण्याचा प्लॅन आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने दिलेले उत्तर एकूण सारेच हैराण झाले. ती म्हणाली, की माझ्याकडे एक मांजर आणि कुत्रा आहे. तेच माझे कुटुंब आहे. आपल्या देशात लोकसंख्या जास्त असल्याने या देशात मुलाला आणण्याची इच्छा नाही..! अभिनेत्री कविता कौशिकचे २०१७ मध्ये तिचा मित्र उद्योगपती रोनीत बिसवाशी याच्याशी लग्न झाले होते. तिची लोकप्रिय मालिका एफआयआरनंतर तिने काही काळ शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. एफआयआर मालिकेतील तिची चंद्रमुखी चौटालाची भूमिका विशेष गाजली होती.