विद्याकडून सारा अली खानचे तोंडभरून कौतुक...; म्हणाली...
 

 
अभिनेत्री सारा अली खान आणि अक्षय कुमारचा अतरंगी रे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांच्या तो चांगलाच पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील सारा अली खानने तिच्या अभिनयामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेकांनी सारा अली खानचे कौतुक केले. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने साराला फोन करून शुभेच्छा देत कौतुक केले. स्वतः साराने याबद्दल माहिती दिली. सारा म्हणाली, की मला डर्टी पिक्चरमधील विद्या यांची भूमिका प्रचंड आवडली होती. त्यामुळे तसा अभिनय करण्यासाठी माझा प्रयत्न होता.

अतरंगी रे बघिल्यानंतर मला विद्या बालन यांचा फोन आला. तुझ्या अभिनयात एकही चूक झाली नाही. मसाला आणि मस्ती आणि इमोशनल या सर्व बाबी तू चांगल्या पद्धतीने केल्या. मी सिनेमाचा पूर्ण आनंद घेतला आणि मला सिनेमा प्रचंड आवडला, असं विद्या बालन म्हणाल्याचे साराने सांगितले. अतरंगी रे या चित्रपटात अक्षयकुमार आणि धनुष यांची महत्त्वाची भूमिका आहे.