उर्फी म्हणते, मुस्लिम पुरुषांनी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा...!
Jan 3, 2022, 15:24 IST
अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड आणि हॉट लूकने नेहमीच चर्चेत असते. तिच्या विधानांमुळेसुद्धा ती आता मीडियासाठी चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी मी इस्लामला मानत नाही. मुस्लिम तरुणाशी लग्न करणार नाही, असं विधान तिने केलं होतं. त्यामुळे कट्टरपंथीयांच्या प्रचंड ट्रोलला तिला सामोरे जावे लागले होते. मात्र ती तिच्या विधानावर सध्याही ठाम असून, टीकाकारांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे.
टीका करणाऱ्यांना कुराण वाचण्याचा सल्ला उर्फीने दिला आहे. याशिवाय मुस्लिम पुरुषांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचेही तिने म्हटले आहे. एका व्हिडिओद्वारे तिने तिची बाजू मांडली असून, सध्या तो व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे. जे लोक माझ्यावर टीका करून मी इस्लामला डाग आहे असं म्हणतात.
माझ्याविरोधात फतवा काढण्याची व माझ्या कपड्यांवरून मला ट्रोल करतात. त्या सर्व मुस्लिम कट्टरपंथीयांनी आधी कुराण नीट वाचले पाहिजे. एका महिलेला जबरदस्ती करून बुरखा घालायला लावा किंवा अंगभर कपडे घालायला लावा असं कुराणमध्ये कुठं लिहिलंय, असा सवाल तिने केला आहे. स्त्रीने पूर्ण कपडे घालावे असं लिहिलं असलं तरी ती तसं करत नसेल तर तिला शिविगाळ करा. जबरदस्ती करून कपडे घालायला लावा असा त्याचा अर्थ होत नाही, असेही उर्फी म्हणाली.