State News : प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटलांचे नाव “शिवलीला’ का आहे माहितेय?; वाचून तुमच्या डोळ्यांत येईल पाणी!

मुंबई : कीर्तनाच्या अनोख्या शैलीने प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या आहेत. आता त्यांची एंट्री मराठी बिग बॉसमध्ये झाली आहे. या शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत आहेत. बिग बॉस मराठीच्या या शोमध्ये शिवलीला पाटील यांचे आई- वडील त्यांना भेटायला आले होते. यावेळी मांजरेकर यांनी मुलीचे नाव शिवलीला का ठेवले, असा प्रश्न विचारला. त्यावेळी पाटील …
 

मुंबई : कीर्तनाच्या अनोख्या शैलीने प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या आहेत. आता त्यांची एंट्री मराठी बिग बॉसमध्ये झाली आहे. या शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत आहेत. बिग बॉस मराठीच्या या शोमध्ये शिवलीला पाटील यांचे आई- वडील त्यांना भेटायला आले होते. यावेळी मांजरेकर यांनी मुलीचे नाव शिवलीला का ठेवले, असा प्रश्न विचारला. त्यावेळी पाटील यांच्या आईने सांगितले की, लग्नानंतर जवळपास ७ वर्षे त्यांना मूलबाळ झाले नाही. त्यामुळे घरचे चिंतित होते. अशातच पाटील यांच्या आईने शिवलीला या ग्रंथाचे १०८ वेळेस पारायण केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना साक्षात्कार झाला. त्यांना बाळ झाल्याचे स्वप्न पडले. डॉक्टरांकडे तपासणी केली असता गरोदर असल्याचे निदान झाले. शिवलीला ग्रंथांचा प्रसाद म्हणून मुलीचे नाव “शिवलीला’ ठेवण्यात आले असे पाटील यांच्या आईने सांगितले. हा किस्सा ऐकताना शोमध्ये उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आले होते.