Special Interview : तारा सुतारियाला ऋतिकची तडप!
Updated: Dec 21, 2021, 10:47 IST
अनिता कुलकर्णी
अभिनेत्री तारा सुतारियाने स्टुडंट ऑफ द इयर-2 मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ती तडप चित्रपटात अहान शट्टीसोबत दिसली आहे. तडप चित्रपटाचे दिग्ददर्शन प्रसिद्ध दिग्ददर्शक मिलन लुथरिया यांनी केले आहे. ताराने दिलेल्या मुलाखतीत चित्रपट आणि बॉलीवूडबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या...
- प्रश्न ः तुझं पहिलं प्रेम कोण होतं किंवा तुला सर्वांत आधी कोणता पुरुष आवडला होता?
- तारा सुतारिया ः माझा पहिला क्रश ऋतिक रोशन आहे. त्याचा कहो ना प्यार है हा माझा सर्वांत आवडता चित्रपट आहे. मला ऋतिक रोशन आवडतो कारण तो जसा आहे तसाच स्वतःला समोर आणतो. दिखावा करत नाही. तो खूप हँडसम आहे. कमालीचा डान्सर आहे. वयानेही त्याच्या सौंदर्याला प्रभावित केलेले नाही. तो खूप प्रतिभाशाली आहे. आतापर्यंत त्याने अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. माझे स्वप्न आहे की त्याच्यासोबत एकदा तरी नायिका म्हणून काम करायला मिळावं.
- प्रश्न ः तारा यावेळी तुला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची तडप आहे?
- तारा सुतारिया ः मला यावेळी सर्वांत जास्त प्रेक्षकांच्या प्रेमाची तडप आहे. माझ्या आणि अहानच्या या चित्रपटाला घेऊन मी प्रचंड उत्साहित आहे. कारण कोरोनाच्या दोन वर्षांनंतर हा चित्रपट रिलिज होणार आहे. मला चिंताही वाटत आहे की काय होईल. प्रेक्षकांना चित्रपट आवडेल असे मला वाटत असले तरी प्रेक्षकांनी आम्ही जी मेहनत या चित्रपटासाठी घेतली आहे ती ओळखावी आणि तिला न्याय द्यावा.
- प्रश्न ः कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना तू बॉलीवूडमध्ये आलीस आणि स्टुडंट ऑफ द इयर-2 सारखा यशस्वी चित्रपट दिलास. सर्वांत जास्त स्वतःचा अभिमान कधी वाटला?
- तारा सुतारिया ः अभिमान वाटावा असे अनेक प्रसंग मी अनुभवले आहेत. मी माझ्या हिंमतीवर आणि मेहनतीवर जे संबंध बॉलीवूडमध्ये बनवले आहेत, त्याबद्दल मला स्वतःचा अभिमान वाटतो. मी जे काही केले ते माझ्या हिंमतीवर केलं. कुणी माझ्यासाठी काही केलं नाही. मला चांगले वाटते जेव्हा मी माझ्या आई-वडिलांना करिअरबद्दलची खुशखबर देते. मी सध्या त्यांच्यासाठी हॉलीडे प्लॅन करतेय. पण ते सिक्रेट आहे.
- प्रश्न ः तडप चित्रपटातून अहान तुझ्यासोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. तो तुझ्यासाठी कसा वेगळा सहकलाकार सिद्ध झाला...
- तारा सुतारिया ः अहान खूप गोड, संवेदनशील आणि लाजरा आहे. त्याचे हे गुण मला खूप आवडले. जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आमचे विचारही खूप जुळतात. त्याच्यासोबत काम करताना मला खूप मजा आली.
- श्न ः तुझा दुसरा चित्रपट मरजावां बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. त्याचा तडपवर काही असर दिसेल असे वाटते का?
- तारा सुतारिया ः मी अशा गोष्टींचा जास्त विचार करत नाही की जास्त अपेक्षाही ठेवत नाही. मला वाटते की कथा, अभिनय आणि कंटेट चांगला असेल तर प्रेक्षक त्याला बघायला नक्कीच येतील. दोन वर्षांनंतर माझा चित्रपट थिएटरमध्ये येतोय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझे काम आवडेल.
- प्रश्न ः आगामी काळात तू कोणत्या हिरोंसोबत काम करण्यास उत्सुक असशील?
- तारा सुतारिया ः माझा आगामी चित्रपट एक विलेन रिटर्न्स हा जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरसोबत आहे. त्यानंतर एक मोठी घोषणा होणार असून, त्याबद्दल मी तूर्त सांगणार नाही. अर्जुन रामपाल, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, राजकुमार राव यांसारख्या कलाकारांसोबत काम करण्याची माझी इच्छा आहे.
- प्रश्न ः मुलगी म्हणून आजपर्यंत कुणी कमी लेखले का? तसा काही कटू अनुभव आला का?
- तारा सुतारिया ः माझ्या घरात माझ्याशिवाया एक जुळी बहीण आहे. माझ्या आईने मला नेहमी एकच शिकवले की जर कुणी कमी लेखत असेल तर आपल्याला कमी न समजता त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायचे. बॉलीवूडमध्ये अशा प्रकारचा काही अनुभव आजवर तरी आलेला नाही. मात्र आगामी काळात मी आणखी स्वतःला सशक्त सिद्ध करणार आहे. कारण या इंडस्ट्रीज मुलींनी स्ट्राँग असणे गरजेचे आहे. माझे नशिब चांगले आहे की ज्या लोकांसोबत मी करतेय ते मला सुरक्षित ठेवतात. त्यामुळे मला नेहमी त्यांच्यासोबत काम करताना सुरक्षित वाटते. मी मुलींना सांगू इच्छिते की तुमच्यासोबत काही चुकीचे होत असेल तर गप्प न बसता आवाज उठवावा. कडक भूमिका घ्यावी... माझ्या आईनेही मला हाच सल्ला दिला आहे. मी जेव्हा शाळेत होती तेव्हा खूप लाजरी होती. कुणाशी जास्त बोलत नव्हती. मात्र माझी जुळी बहीण खूप बिनधास्त होती. ती अनेकदा माझ्यासाठी बोलायची. मात्र आता मी स्ट्राँग झाली आहे.