...म्‍हणून ते माझ्यासोबत काम करत नाहीत!; तापसीची खंत

 
अभिनेत्री तापसी पन्‍नूसोबत टॉप हिरो काम करायला नकार देतात. कारण तिचे बहुतांश चित्रपट स्‍त्रीकेंद्रीत असतात. त्‍यामुळे तिच्‍याच भोवती फिरत असतात. परिणामी नायकाला फार कमी स्‍थान असते आणि यामुळेच मोठे अभिनेते तिच्यासोबत काम करायला नकार देतात, अशी खंत खुद्द तापसीनेच व्यक्‍त केली आहे.
तापसीचा ‘रश्मी रॉकेट’ १५ ऑक्टोबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. एका चित्रपटात माझी दुहेरी भूमिका होती. तेव्हा एक प्रसिद्ध अभिनेता म्‍हणाला, इथे एका तापसीला सांभाळणे अवघड आहे. यात तर दोन आहेत.. माझ्या चित्रपटात सहानुभूती मुलीच्‍या बाजूने असल्याने अभिनेते नकार देतात. मोठे कलाकार महिलांवर आधारित चित्रपट करण्यास टाळाटाळ करतात, असेही तिने सांगितले. कोणत्याही निर्मात्यासोबत बसते, तेव्हा टॉपच्‍या पाच अभिनेत्यांची यादी त्‍यांच्‍याकडे असते. विशेष म्‍हणजे त्‍या सर्व अभिनेत्‍यांनी कधी ना कधी माझ्यासोबत काम केलेले असते. तरीही ते आता नकार देतात, असे तापसी म्‍हणाली.  ‘रश्मी रॉकेट’मध्ये तापसीसह सुप्रिया पाठक, अभिषेक बॅनर्जी, प्रियांशु पेन्युली, सुप्रिया पिळगावकर आदी कलाकार आहेत.