...म्हणून रविना टंडनने केले घटस्फोटिताशी लग्न!
उद्योगपती आणि चित्रपट वितरक अनिल थडाणी आणि रविना पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पहिल्या भेटीच्या दोन महिन्यांनंतर दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली. योग्य जीवनसाथी मिळाल्याची खात्री झाल्याने दोघांनी लग्नाला उशीर केला नाही. विशेष म्हणजे रविनाने लग्नाआधीच दोन मुलींना दत्तक घेऊन आई होण्याचा निर्णय घेतलेला होता. जो व्यक्ती आपल्या मुलींनासुद्धा प्रेम देईल त्याच्याशीच लग्न करेल, असा निर्णय रविनाने घेतलेला होता आणि उद्योगपती अनिल यांनी रविनाच्या निर्णयाचा स्वीकार केला. त्याचबरोबर दोघांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला. लग्नानंतरसुद्धा अनिल रविनाला दिलेले वचन पाळताना दिसत आहे. पतीच्या वाढदिवशी रविनाने केलेल्या एका पोस्टमध्ये पतीचे खूप कौतुक केले. जो तुम्हाला जसेच्या तसे स्वीकारतो असा जोडीदार कुणाला नको असेल. सर्वोत्तम पती, वडील, जावई असे रविनाने पतीचे कौतुक केले आहे. दोघांच्या प्रेमामुळे त्यांचे नाते आजपर्यंत मजबुतीने टिकून आहे.