ब्रेकअपनंतर तो पुन्हा आयुष्यात यावा म्हणून तिने केली काळी जादू!; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Dec 17, 2021, 10:36 IST
मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने नुकनेच ३८ व्या वर्षात पदार्पण केले. अभिनयापेक्षा ती नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे आणि रिलेशनशिपमुळेच चर्चेत राहिली. ८ वर्षे एका अभिनेत्यासोबत ती प्रेमसंबंधात होती. नंतर दोघांचा ब्रेकअप झाला. मात्र तो पुन्हा आपल्या आयुष्यात यावा म्हणून दिव्यांकाने काळी जादू केली. तिने स्वतःच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.
अभिनेता शरद मल्होत्रा याच्यासोबत "बनू मैं तेरी दुल्हन' या मालिकेत ती काम करत होती. दरम्यान त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ८ वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअप नंतर मी दुःखी होते. तो पुन्हा माझ्या आयुष्यात यावा यासाठी मी खूप प्रयत्न केले. यासाठी मी काळ्या जादूचीही मदत घेतली... पण ते काही जमलं नाही, असे ती मुलाखतीत म्हणाली होती.