शाल्मली खोलगडेचं फरहान शेखसोबत लग्न!
Nov 30, 2021, 16:29 IST
मुंबई : गायिका शाल्मली खोलगडेने गुपचूप लग्न उरकले असून, २२ नोव्हेंबरला ती विवाहबंधनात अडकली. लग्न झाल्याचे फोटो तिने सोशल मीडियावर टाकले आहेत. अभियंता फरहान शेख याच्यासोबत तिने लग्न केले.
उद्या, १ डिसेंबरला तिने मित्रमंडळींसाठी रिसेप्शन पार्टी ठेवली आहे. शाल्मली ही फरहानसोबत सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. कोणताही गाजावाजा न करत साध्या पद्धतीने तिने विवाह केला. यावेळी तिच्या आणि फरहानच्या कुटुंबातील अवघे १५ जण उपस्थित होते. शाल्मली प्रसिद्ध गायिका आहे. तिने परशान (इशकजादे), दारू देसी (कॉकटेल) आणि बालम पिचकारी (ये जवानी है दिवानी) सारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. इंडियन आयडॉल ज्युनियर आणि सूर नवा ध्यास नवा या रिॲलिटी शोमध्ये तिने परीक्षक म्हणून काम पाहिले.