सारा अली खान म्हणते... शाहरुखच्या "या' प्रसिद्ध चित्रपटाच्या रिमेकमध्ये करायचे काम!
Updated: Jan 4, 2022, 10:42 IST
बॉलिवूडची अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती प्रचंड ॲक्टिव्ह असते. नुकताच अक्षयकुमार सोबतचा तिचा अंतरगी रे हा चित्रपट प्रसिद्ध झाला असून, प्रेक्षकांची जाम पसंती चित्रपटाला मिळत आहे. या चित्रपटातील साराच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतीच तिने एक इच्छा व्यक्त केली असून, शाहरुखच्या एका प्रसिद्ध चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करायचे असल्याचे तिने सांगितले आहे.
पिंकविला या वेबसाईटशी बोलताना तिने ही इच्छा व्यक्त केली आहे. शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी यांचा कुछ कुछ होता है...या सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करायची साराची इच्छा आहे. मला हा चित्रपट खूप आवडला होता. या चित्रपटाचा रिमेक बनला तर मी, विजय देवरकोंडा आणि जानव्ही कपूरसोबत करण जोहरने रिमेक बनवावा, असे सारा अली खान म्हणाली. हा चित्रपट खूप हिट होईल. मी त्यांच्याशी बोलेल अन् मला खात्री आहे की ते तयार होतील, असेही सारा म्हणाली.