रणबीर-आलियाचं लग्न एप्रिलमध्ये..!
रणबीरने लग्नाबद्दल सांगितले, की आलियाशी २०२० मध्येच लग्न करायचे होते. मात्र कोरोनाची लाट आली. आता आम्ही दोघेही सातफेरे घेण्यास उत्सुक असून, लवकरच लग्नाची तारीख जाहीर करू, असे तो म्हणाला. काही कामे बाकी असल्याने लग्न पुढे ढकलल्याचेही रणबीर म्हणाला. आगामी चित्रपटांपुढे शूटिंग झाल्यानंतर जानेवारी ते जूनपर्यंत काेणतेही नवे काम हे जोडपे हाती घेणार नाही. लग्न सोहळा, हनीमून यातच हे सहा महिन्याचे घालण्याचे त्यांचे प्लॅनिंग आहे.
सध्या आलिया गंगूबाई काठियावाडी, RRR, डार्लिंग्स, रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचे शूटिंग अजून सुरूच आहे. रणबीर शमशेरा, ॲनिमल या चित्रपटांत व्यस्त असल्याचे बॉलीवूड सूत्रांनी सांगितले. घाईगडबडीत लग्नाची मजा या जोडप्याला हरवायची नाही. त्यामुळे निवांत वेळ काढला जात आहे. कपूर कुटुंब मोठे आहे. सध्या त्यांच्या रणबीरच्या कृष्णा राज बंगल्याचे नुतनीकरण सुरू आहे.