राजेश्वरला मिळाले बॉलीवूडचे तिकिट!

 
फँड्री चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातसाठी अखेर बॉलिवूडचे दार उघडले आहे. पुणे टू गोवा या चित्रपटातून ती बॉलीवूड विश्वात पर्दापण करत असून, तिच्यासोबत आदित्यराजे मराठेदेखील झळकणार आहे.
फँड्री, आयटमगिरी या चित्रपटांतून अभिनयकौशल्य दाखवणारी राजेश्वरी दीर्घकाळापासून कामाच्या शोधात होती. अखेर तिला डायरेक्ट हिंदी चित्रपटात काम मिळाले. या चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस मिळून करत आहेत. कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲक्शनचा मिलाफ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असे राजेश्वरी म्हणाली.