चेंजिंग रूममध्ये कॅमेरा ठेवून काढला न्यूड व्हिडिओ!; "या' अभिनेत्रीला अटक

 
चेंजिंग रूममध्ये गुपचूप कॅमेरा ठेवून मैत्रिणीचा न्यूड व्हिडिओ काढल्याप्रकरणी एका पाकिस्तानी अभिनेत्रीला लाहोर पोलिसांनी अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने मैत्रिणीचा कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या अभिनेत्रीच्या विरोधात मैत्रिणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. खुशबू असे या पाकिस्तानी अभिनेत्रीचं नाव आहे. तिच्यासोबत काशिफ खान नावाच्या एका व्यक्‍तीविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोघांनी चेंजिंग रूममध्ये गुपचूप कॅमेरा लावून ठेवला होता.

पीडित तरुणी कपडे बदलत असतानाचे चित्रिकरण त्‍याद्वारे झाले. अश्लील व्हिडिओ शूट केल्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला धमकी देण्याचा प्रयत्न केला. खुशबूने थिएटरमध्ये काम करणाऱ्या काशिफ खानला चेंजिंग रूममध्ये कॅमेरा लावण्यासाठी एक लाख रुपये दिले होते, असेही समोर आले आहे. या माध्यमातून नाटकात काम करणाऱ्या चार अभिनेत्रींचे त्‍यांनी न्यूड व्हिडिओ शूट केले आहेत. ते व्हिडिओ शूट केल्यानंतर इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकीसुद्धा दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.