बातमी मनोरंजनाची! पोरांना येड लावणारी गौतमी एका कार्यक्रमाचे किती पैसे घेते माहिती आहे का? वाचा बातमीत....

 
बुलडाणा (लाइव्ह ग्रुप नेटवर्क):  गौतमी पाटीलच नुसत नाव एकल तरी पोरांना थर- थरायला होत. सोशल मीडियावर तर गौतमी पाटीलचा जलवा हाय. अनेक पोरांच्या स्टेटसला फक्त गौतमीच दिसतीया..जस काही ती दिलो की धडकन झालीय..पोरांच्या काळजाची जागा घेणाऱ्या गौतमीच बालपण अतिशय कष्टात गेलय.
गौतमीच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडून दिलं. त्यामुळे गौतमी तिच्या आईसोबत मामाची गावी राहू लागली. पैसे मिळवण्यासाठी गौतमी  बॅक डान्सर म्हणून काम करू लागली. सगळ्यात आधी अकलूजच्या लावणी महोत्सवात तीन बॅक डान्सर म्हणून काम केलं. यावेळी तीच मानधन होत केवळ ५०० रुपये. मात्र नंतरच्या काळात गौतमी पाटील कुठल्याही कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होऊ लागली. नेत्यांचा वाढदिवस असो की गावची जत्रा..कार्यक्रम गौतमी पाटीलचाच झाला पाहिजे असा आग्रह पोरं धरू लागली. सध्या गौतमी एका कार्यक्रमाचे सव्वा ते पावणेदोन लाख रुपये इतकं मानधन घेत आहे.