मलायकाचं वय काय? ती तुझ्यापेक्षा १२ वर्षांनी मोठी... विचारताच संतापला अर्जुन!
Jan 7, 2022, 02:16 IST
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासोबत प्रेमसंबंधात आहे. दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची जाहीर कबुलीसुद्धा दिली आहे. मलायका अर्जुनपेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. अर्जुन ३६ वर्षांचा तर मलायका ४८ वर्षांची आहे. दोघांच्या वयात असलेल्या अंतरामुळे दोघेही अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात.
दोघांच्या सोशल मीडियावर ट्रोलर्स वेगवेगळ्या कमेंट करून ट्रोल करतात. वयाचा फरक तरी बघायचा होता. आता काय म्हातारीसोबत लग्न करणार का, अशी कमेंट एका यूझर ने केली होती. ट्रोलर्सच्या कमेंटमुळे अर्जुन कपूर चांगलाच संतापला आणि ट्रोल करणाऱ्यांना त्याने मूर्खांचा बाजार असल्याचे म्हटलेय.
मसाला डॉट कॉम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अर्जून त्याच्या प्रेमाबद्दल व्यक्त झाला. लोक ज्या कमेंट करतात त्यातील ९० टक्केसुद्धा आम्ही पाहत नाही. मात्र मीडिया या मूर्ख लोकांच्या टिपण्यांवर चालतो असे वाटते, असे तो म्हणाला. जे लोक माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी करतात, तेच कमेंट करतात. त्यामुळे मी त्याला विशेष महत्त्व देत नाही, असे अर्जुन कपूर म्हणाला. कुणाचे वय किती याची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. वयावरून नातं बघणं म्हणजे मूर्खपणा आहे, असंही अर्जुन म्हणाला.