शमिता अन्‌ राकेशचं नक्‍की चाललं काय?

नवरा राज कुंद्रा संकटात असल्याने अभिनेत्री शिल्पा शेट्टी त्याला सोडविण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे तिची बहीण शमिता शेट्टी मात्र प्रेमाचे गाणे गाताना दिसतेय. बिग बॉसमध्ये सध्या शमिता असून, या शोमध्ये मराठमोळा अभिनेता राकेश बापटवर तिचे प्रेम जडल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोघांची एकमेकांशी असलेली वागणूक त्यांच्याबद्दल संशय निर्माण करत आहे. तो तिच्याशी फ्लर्ट करतो. ती त्याची …
 

नवरा राज कुंद्रा संकटात असल्याने अभिनेत्री शिल्पा शेट्टी त्‍याला सोडविण्याच्‍या प्रयत्‍नात आहे. दुसरीकडे तिची बहीण शमिता शेट्टी मात्र प्रेमाचे गाणे गाताना दिसतेय. बिग बॉसमध्ये सध्या शमिता असून, या शोमध्ये मराठमोळा अभिनेता राकेश बापटवर तिचे प्रेम जडल्‍याची चर्चा सुरू झाली आहे. दोघांची एकमेकांशी असलेली वागणूक त्‍यांच्‍याबद्दल संशय निर्माण करत आहे. तो तिच्‍याशी फ्लर्ट करतो. ती त्याची काळजी घेते. त्याला भरवते. दोघे एकमेकांच्या मतांचा आदर करतात. थोडक्‍यात ते एकमेकांच्या जवळ येत आहेत. कोणत्याही टास्कवेळी किंवा गप्पा मारताना दोघे एकमेकांचा हात धरून बसलेले असतात. वैयक्‍तीक आयुष्याबद्दल गप्पाही मारतात. जोडीदार बदलण्याची संधी या शोमध्ये आली होती. मात्र दोघांनी एकमेकांची साथ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दोघांतील वाढते नाते दोघांच्‍या चाहत्यांना सुखावत असून, बिग बॉस शोमधील हे नाते पुढे जाऊन लग्‍नात रूपांतरीत होते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉस हा शो सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दीड महिन्यासाठीच सुरू आहे. तरीही या शोला सध्या चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.