Chanderi News : सोनाली कुलकर्णी म्‍हणाली, अनुभव-चुकांतून शिकत गेले, कुणी गॉडफादर नव्‍हता, पण तरीही स्वतःला सिद्ध केलं!

मराठमोळी सोनाली कुलकर्णी आता नव्या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. महाराणी ताराबाईसाहेब यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले अाहे. तिच्या कलाक्षेत्रातील करिअरला १४ वर्षे पूर्ण झाली असून, अभिनेत्री म्हणून या काळात मी अधिकाधिक प्रगल्भ होत गेले. परिस्थिती, अनुभव, यश-अपयश आणि चुकांतून शिकत गेले, अशी भावना सोनालीने व्यक्त केली. वयाच्या अवघ्या १६ …
 

मराठमोळी सोनाली कुलकर्णी आता नव्या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. महाराणी ताराबाईसाहेब यांच्‍या आयुष्यावर हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले अाहे. तिच्‍या कलाक्षेत्रातील करिअरला १४ वर्षे पूर्ण झाली असून, अभिनेत्री म्हणून या काळात मी अधिकाधिक प्रगल्भ होत गेले. परिस्थिती, अनुभव, यश-अपयश आणि चुकांतून शिकत गेले, अशी भावना सोनालीने व्‍यक्‍त केली.

वयाच्‍या अवघ्या १६ व्या वर्षी सोनाली कलाक्षेत्रात आली होती. तिने सर्वात आधी ‘हा खेळ संचिताचा’ ही मालिका केली होती. तिनं कुठलंही अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेलं नव्‍हतं. तिचा या क्षेत्रात कुणी गॉडफादर नव्‍हता. मात्र तरीही तिने स्वतःला या क्षेत्रात सिद्ध केलं. या प्रवासात तिला कुटुंबाचा मात्र भक्‍कम पाठिंबा लाभला, असे सोनालीने सांगितले. सोनालीचं नुकतंच लग्‍न झालं आहे. त्‍यामुळे लग्‍नानंतरही करिअर करणार का, या प्रश्नाला तिने लगेच नवा चित्रपट स्वीकारून उत्तरही दिले.

ती पतीसोबत मालदिवलाही जाऊन आली. तिने आजवर पोर्तुगाल, मॉरिशस, दुबई अशी भटकंती केली आहे. तिच्‍या नवऱ्यालाही भटकंती करायला आवडतं. आम्‍ही दोघेही आयुष्यभर फिरत राहू, असे सोनाली म्‍हणाली. सोनाली लवकरच निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. मात्र त्‍यात तीच अभिनेत्री असेल का, हे तिने सांगितलेले नाही. सध्या सगळं काही प्राथमिक अवस्‍थेत आहे. ज्‍यावेळी नक्‍की काही ठरेन तेव्‍हा सांगेल, असे ती म्‍हणाली. यंदाचा गणेशोत्‍सव सोनाली कुलकर्णी नेहमीप्रमाणे थाटामाटात साजरी करणार असून, पर्यावरण गणेशोत्‍सवाचा ती चाहत्‍यांनाही संदेश देते. नैसर्गिक गोष्टीतून साकारलेली गणेशमूर्ती माझ्याकडे आली असल्याचे ती म्‍हणाली.