Chanderi News : नववीत असताना झाले होते अभिनेत्री तापसीला प्रेम!; प्रियकर होता दहावीत!!

‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातून नुकतेच प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या पहिला प्रेमाचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. ती नववीत असताना एका मुलाच्या प्रेमात पडली होती. तो तिला खूप आवडायचा. दहावीत होता. बोर्डाची परीक्षा असल्याने त्याने तिच्याशी ब्रेकअप केले. मात्र ब्रेकअपचे कारण त्याने सांगितलेच नव्हते, असे तापसी म्हणाली. अभिनय कौशल्य आणि सौंदर्यामुळे स्वतंत्र चाहता वर्ग …
 

‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातून नुकतेच प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिनेत्री तापसी पन्‍नूने आपल्या पहिला प्रेमाचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. ती नववीत असताना एका मुलाच्‍या प्रेमात पडली होती. तो तिला खूप आवडायचा. दहावीत होता. बोर्डाची परीक्षा असल्याने त्‍याने तिच्याशी ब्रेकअप केले. मात्र ब्रेकअपचे कारण त्‍याने सांगितलेच नव्‍हते, असे तापसी म्‍हणाली.

अभिनय कौशल्य आणि सौंदर्यामुळे स्वतंत्र चाहता वर्ग तयार करणाऱ्या तापसीचे वैयक्‍तीक आयुष्य जाणून घेण्याची उत्‍सुकता अनेकांना असते. तिने आजवर सूरमा, मुल्क आणि मनमर्जिया यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पहिल्या प्रेमाचे ब्रेकअप झाल्यानंतर मी खूप रडली होती, असे तापसी म्‍हणाली. जेव्‍हा तिला प्रेम झाले तेव्हा तिच्‍याकडे मोबाइल नव्हता.

प्रियकराशी बोलण्यासाठी पीसीओ बूथचा वापर ती करायची, असे तिने सांगितले. आता ज्‍या कुणासोबत प्रेमसंबंध जोडेल तो व्यक्‍तीला समजू घेईन. त्‍याचा आदर करेन. त्‍यानेही मला समजून घ्यावे, असे तापसी म्‍हणाली. तिचा ‘रश्मी रॉकेट’ चित्रपट १५ ऑक्टोबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. नंदा पेरियासामी यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. यात सुप्रिया पाठक, अभिषेक बॅनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिळगावकर तिचे सहकलाकार आहेत.