Chanderi News : धोनीच्या संघातील हा खेळाडू “या’ मराठी अभिनेत्रीला करतोय डेट!
मुंबई : “काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव सध्या चर्चेत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात यंदाची आयपीएल गाजवणारा मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडसोबत तिचे नाव जोडले जात आहे.
यंदाच्या स्पर्धेत त्यानं ऑरेंज कॅप मिळवली आहे. मैदानावर चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू सायली संजीवला डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. १९९३ मध्ये धुळ्याला जन्मलेली सायली ही ऋतुराजची चांगली मैत्रीण आहे. दोघेही कॉलेज जीवनातले मित्र आहेत. अभिनयाकडे कल असलेल्या सायलीने चित्रपटात सुद्धा भूमिका साकारल्या आहेत. ऋतुराजसोबत ती अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र दोघांनी अजूनही मैत्रीपलीकडे त्यांचे काही खास नाते आहे का… यावर अधिकृत भाष्य केलेले नाही.