Chanderi News : चेकअप करताना डॉक्टरने केला होता नको तिथे स्पर्श!; अभिनेत्री नीना गुप्ता यांचा गौप्यस्फोट
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांचे ‘सच कहूं तो’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकात त्यांनी आयुष्याचे अनेक सिक्रेट उलगडले आहेत. लहानपणी डोळे तपासणीसाठी गेल्यानंतर डॉक्टरनेच विनयभंग केला होता, असा खुलासा नीना यांनी पुस्तकात केल्याने खळबळ उडाली आहे.
भावासोबत त्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. भाऊ बाहेर थांबला. डॉक्टरांनी केबीनमध्ये तिला एकटीलाच बोलावले. डोळे तपासत असताना अचानक डॉक्टरने इतर ठिकाणी स्पर्श करायला सुरुवात केली. ज्याचा डोळ्यांशी काही संबंध नव्हता. त्यामुळे आपण खूप घाबरलो होतो, असे नीना म्हणाल्या. त्यावेळी स्वत:चा तिरस्कार वाटायला लागला. गुपचूप कोपऱ्यात बसून रडायचे.
आईला सांगण्याची सुद्धा हिंमत नव्हती, असे पुस्तकात त्यांनी म्हटले आहे. टेलरबद्दलही असाच वाईट अनुभव आल्याचे त्या म्हणाल्या. मात्र तो विनयभंग करतोय हे माहीत असूनही त्याच्याकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असे त्या म्हणाल्या आहेत. सध्या मुला, मुलींना गुड टच बॅड टच शिकवला जातो. पण त्यावेळी असं सांगितलं जायचं नाही. तरुण होईपर्यंत या गोष्टींवर कुणी बोलायचं नाही, असे त्या म्हणाल्या.